Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, March 22, 2024

सोलापूर पोलीस मुख्यालय येथील पोलीस रुग्णालय परिसरात जागतिक वनदिन साजरा..



 सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर पोलीस मुख्यालय येथील पोलीस रुग्णालय परिसरात जागतिक वनदिन साजरा.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर पोलीस मुख्यालय आवारात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनासाठी पोलीस रुग्णालय कार्यरत आहे. आज जागतिक वनदिन आहे. या वनदिना निमित्त रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्याचे आयोजन करण्यात आले होते.

 त्या अनुषंगाने सोलापूर पोलीस रुग्णालय येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी श्री राघवेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील परिसरात शोभिवंत व ऑक्सिजन निर्माण करणारे औषधी वनस्पती लावण्यात आले. पुढे जाऊन या परिसरात काही दिवसात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचं निश्चित झाले आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमास पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी सर्व वैद्यकीय स्टाफ कर्मचारी व सौ गुरुदेवीताई पुजारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 


यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांनी उपस्थितीत राहुन रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

  डॉ मनोज देवकर यांचा पर्यावरणाच्या कार्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र गायकवाड यांनी त्यांचा सन्मान केला. तसेच या परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आयोजन करून वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment