सारा न्यूज नेटवर्क -
योगीराज बेंबळगी यांची डेप्युटी इंजीनिअरपदी निवड झाल्याने गुरववाडीचे सरपंच माळप्पा पुजारी यांच्या हस्ते सत्कार संपन्न..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्हा परिषद मध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये अभियंता पदावर कार्यरत श्री योगीराज बेंबळगी यांची नुकतीच उत्तर सोलापूर तालुक्याचे डेप्युटी इंजीनिअरपदी (पाणी पुरवठा विभाग) निवड झाली. त्यांनी आज पर्यंत अनेक ठिकाणी आपले काम व सेवा उत्कृष्ट पणे निभावून कार्य केले आहे. त्यांच्या या निवडीने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
त्यांची डेप्युटी इंजीनिअर पदी निवड झाल्याबद्दल गुरववाडीचे सरपंच श्री माळाप्पा पुजारी यांच्या शुभहस्ते शाल, फेटा व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गुरववाडी ता.अक्कलकोट येथील सरपंच माळप्पा पुजारी, GK मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, कनिष्ठ अभियंता जयवंत जाधव, व क्लार्क श्री राहुल बेनुरकर इत्यादी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment