सारा न्यूज नेटवर्क -
कार्यालयीन वेळेत डॉ शिरशेट्टी अनुपस्थित जन्म -मृत्यू कार्यालयाच्या उपनिंबधकांना नोटीस..
सोलापूर (प्रतिनिधी ):- जन्म -मृत्यू कार्यालयात कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहिल्या प्रकरणी उपनिंबंधक डॉ शिरशेट्टी यांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिका प्रशासक शीतल तेली यांच्याकडे तक्रार केली होती.
महापालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (डफरीन ) हॉस्पिटल येथे जन्म -मृत्यू नोंद कार्यालय आहे शुक्रवारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपनिबंधक आणि संबंधतीत कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळले माजी नगरसेवक अंनत जाधव यांनी छायाचित्र काढून महापालिका प्रशासक यांच्याकडे तक्रार केली. जाधव यांनी विचारल्यावर शिरशेट्टी या जेवायला गेल्या चे सांगण्यात आले. दुपारी सव्वाचार वाजेपर्यंत कोणीच नव्हते याबद्दल च्या तक्रारी ची दखल घेत डॉ शिरशेट्टी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
🔸माझ्यावर लावलेले आरोप चुकीचे आहेत याबद्दल महापालिका प्रशासक यांच्याकडे मी सविस्तर खुलासा करेन
डॉ वैशाली शिरशेट्टी
जन्म -मृत्यू नोंद कार्यालय उपनिबंधक
🔸 जन्म -मृत्यू कार्यालयाच्या कामकाज बाबत गेल्या अनेक दिवसापासून तक्रारी येत होत्या मी स्वतः गेल्यावर मला ही तोच अनुभव आला. प्रशासक यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे त्या योग्य कारवाई करतील.
अंनत जाधव माजी नगरसेवक
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment