सारा न्यूज नेटवर्क -
महा एनजीओ फेडरेशनतर्फे महाराष्ट्रातील २५ कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न
पुण्यामध्ये सोलापूरतील ५ कर्तृत्ववान महिलांचा गौरव
पुणे(प्रतिनिधी) : - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक, अनाथ, शिक्षण, आरोग्य, दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिक आणि गोमातेसाठी कार्यरत असलेल्या सोलापुरातील ५ व महाराष्ट्रातील २५ कर्तृत्ववान महिलांना महा एनजीओ फेडरेशनतर्फे राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मॉडेल कॉलनीतील माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सभागृहात राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२४ वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सेक्रेटरी सुशिला राठी, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, स्वाती मुंदडा, फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, गणेश बाकले, अमोल उंबरजे, योगेश बजाज, राहुल जगताप आदी उपस्थित होते.
सोलापुरातील नर्मदा नरेश कनकी, डॉ. सारिका होमकर, अनिता पवार, प्रांजली शैलेश मोहीकर, वैशाली रविंद्र डोंबाळे यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापुरातील कर्तुत्वान महिलांचे शिफारस समन्वयक डॉ मनोज देवकर व समन्वयक महेश कासाट यांनी संचालक अमोल उंबरजे यांच्या मार्फत निवड समिती कडे केले होते.
सुशिला राठी म्हणाल्या, कोणतीही परिस्थिती आली तरी त्यासमोर महिला हार मानत नाहीत. सहनशीलतेने महिला कायम कार्यरत असतात. महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांमध्ये महिला मोठया प्रमाणात कार्यरत आहेत, हे कौतुकास्पद आहे. प्रत्येक महिलेमध्ये राजमाता जिजाऊंचे गुण यावे, अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वाती मुंदडा यांनी आपल्या मनोगत मध्ये महिलांचे कार्य जागतिक पातळीवर कसे चालू आहे आणि समाज्यामध्ये स्त्री चे महत्व जास्त आहे याबाबत विश्लेषण केले.
शेखर मुंदडा म्हणाले, समाजातील विविध क्षेत्रात काम करणा-या महिला आहेत, मात्र ठराविक महिलांनाच पुरस्कार दिले जातात. त्यामुळे तळागाळात काम करणा-या महिलांचा सन्मान महा एनजीओ फेडरेशनतर्फे करण्यात आला. समाजातील वंचित व गरजू घटकांसह गोमातेसाठी काम करणा-या महिलांच्या मागे आपण खंबीरपणे उभे रहायला हवे.
संचालक अमोल उंबरजे म्हणाले की, समाजातील प्रत्येक उपक्रमात महिलांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिला आता पुढे येऊन नव नवीन सामाजिक उपक्रम राबवित आहेत अश्या महिलांना आपण सहकार्य करायला हवे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राजक्ता बगाडे, अपूर्वा करवा, अक्षता जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी उपस्थित मान्यवर व पुरस्कारार्थी महा एनजीओ फेडरेशन जिल्हा समन्वयक :डॉ मनोज देवकर (पर्यावरण दूत- महाराष्ट्र शासन)
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment