सारा न्यूज नेटवर्क -
संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी राधेश्याम गोपीचंद बरय्या यांची निवड..
पुणे (प्रतिनिधी) :- संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्य, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री दत्तात्रय आत्माराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली व आदेशानुसार मा. दिपकभाऊ खोपकर यांच्या नेतृत्वाखाली संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी श्री.राधेश्याम गोपीचंद बरय्या यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
सर्व चर्मकार समाज बांधव व भगिनीं व संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी यांच्या मध्ये सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन च्या माध्यमातून चर्मकार समाजातील युवा शक्ती संघटित करून त्यंचे प्रश्न सातत्याने सोडवून समाजास सहकार्य करत राहतील, व चर्मकार समाजाच्या सर्वांगिन विकासाकरिता प्रयत्न करतील, चर्मकार समाजाचा एकच ध्यास शिक्षण, प्रबोधन, रोजगार हे ध्येय व उद्दिष्ट असून आपली नियुक्ती अस्थाही पुढील आदेशापर्यंत संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन मध्ये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी करण्यात येत आहे. दिलेल्या पदाचा जबाबदारीने समाजाप्रती आस्था ठेऊन समाजोपयोगी कार्य करेल असे आश्वासन नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री राधेश्याम गोपीचंद बरय्या यांनी दिले. संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशनच्या संपूर्ण महाराष्ट्र मधून समाज बांधव व भगिनींनतर्फे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त होत आहे.... !
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment