Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, March 18, 2024

राम हुंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संपादक पुरस्कार मिळाल्याने गुरववाडीचे सरपंच माळप्पा पुजारी यांच्या हस्ते सत्कार संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

राम हुंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संपादक पुरस्कार व वाढदिवस निमित्त गुरववाडीचे सरपंच माळप्पा पुजारी यांच्या हस्ते सत्कार संपन्न..

सोलापूर (प्रतिनिधी) :- मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.  

गेल्या ४ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती व सारा न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पत्रकारीता आणि संपादकीय पदावर काम करीत आहे. आज मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते आदर्श संपादक म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.



राम हुंडारे यांनीआज पर्यंत पत्रकारांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना घरकुल योजना राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा आदी अनेक विषयावर आपले काम व सेवा उत्कृष्ट पणे निभावून कार्य केले आहे. त्यांच्या या निवडीने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच त्यांचा वाढदिवस निमित्त गुरववाडी ता.अक्कलकोटचे सरपंच श्री माळाप्पा पुजारी यांच्या शुभहस्ते शाल, फेटा व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. 

 याप्रसंगी गुरववाडी ता.अक्कलकोट येथील सरपंच माळप्पा पुजारी, योगीराज बेंबळगी डेप्युटी इंजीनिअर उत्तर सोलापूर (पाणी पुरवठा विभाग ) GK मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड, कनिष्ठ अभियंता जयवंत जाधव, व क्लार्क श्री राहुल बेनुरकर इत्यादी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment