सारा न्यूज नेटवर्क -
वंचित महिलांना धान्य देऊन महिलादिनी सन्मान.
महिलादिनी साहेब सत्कार नको पोटाला धान्य द्या...
सोलापूर (प्रतिनिधी) :- 8 मार्च जागतिक महिला दिवस निमित्त संभाजी ब्रिगेड च्या वतीने पालावर राहणाऱ्या वंचित महिलांना आवश्यक असलेले धान्य देऊन महिला दिनी सन्मानित करण्यात आले.
जुळे सोलापूर भागातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या मैदानात पालावर राहणाऱ्या महिलांचा संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने मिठाई मानाचा फेटा व धान्याची गरज ओळखून धान्य देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड कायदेशीर सल्लागार पदी अँड. वैजयंती सातपुते - काशिद यांची निवड करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहरध्यक्ष मोनाली धुमाळ मानव अधिकार.संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष.वैभव धुमाळ मानव अधिकार.संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुनिता ताई बोकडे अश्विनी.ताई मळगे नीर्जा महेंद्रकर राणी रेवणे वंदना महासोडे रेखा साबळ दिपाली जाधव संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले राजेंद्र माने कार्याध्यक्ष अरविंद शेळके सिताराम बाबर रमेश चव्हाण दिगंबर शिरसागर रुपेश क्षीरसावंगी फिरोज सय्यद ओंकार कदम रोहित साळुंखे नितीन गायकवाड तुकाराम माळगे तनिष्क माळगे आधी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment