सारा न्यूज नेटवर्क -
पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कँपमध्ये मार्डी, ता- उत्तर सोलापूर महिला शेतकरी गटास विशेष सन्मान..
पुणे (प्रतिनिधी) :- दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अभिनेते अमीर खान यांच्या संकल्पनेतून पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेची चळवळ सन २०१६ पासून सुरू केली. या मोहिमेत राज्यातील ३९ तालुक्यांतील 3 हजार शेतकरी गट सहभागी झाले होते.यामध्ये फॉर्मर कप 2023 तालुकास्तरीय संयुक्त विजेता गट सूर्यपुत्र सोयाबीन उत्पादक गट गाव -मार्डी तालुका उत्तर सोलापूर तालुकास्तरीय एक लाखाचा प्रथम पुरस्कार महिला शेतकरी गटास विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील रणरागिणी सुवर्णाताई झाडे खेलबुडे यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पहा...
उत्तर सोलापूर-माडीं, बार्शी- कुसळंब, करमाळा-फिसरे, माढा-उपळाई या शेतकरी गटाने मिळवला.तर कळमण येथील रणरागिणी महिला शेतकरी गटास विशेष महिला पुरस्कार देण्यात आला.पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२३ या वर्षाचा बक्षीस वितरण समारंभ पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये संपन्न झाला. यावेळी पाणी फाउंडेशनचे शिल्पकार अभिनेते आमिर खान, किरण राव, डॉ. सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पौळ, विलास शिंदे, अभिनेते जॅकी श्रॉफ, आशितोष गोवारीकर, सिंघम फेम प्रकाश राज आदी उपस्थित होते.
तालुक्यांतील 3 हजार शेतकरी गट सहभागी झाले होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी व जितेंद्र जोशी यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment