सारा न्यूज नेटवर्क -
बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर झोन मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर झोनल आँफिस मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला गेला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व महिला कर्मचारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर 'ताण-तणाव व्यवस्थापन' वर योग शिक्षिका श्रीमती वंदना शिंदे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिला दिनाच्या निमित्ताने विशेष भेटवस्तू देण्यात आल्या.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या माजी कर्मचारी सौ. शोभा मोरे मॅडम यांनी आर्थिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. सौ. शोभा मोरे या मनोरमा सखी मंच सोलापूर, या माध्यमातून खूप सारे महिलांविषयी जनजागृती करत आहेत.
श्रीराम जावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी संजय वाघ (विभागीय प्रबंधक, सोलापूर विभाग) यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment