सारा न्यूज नेटवर्क -
अक्कलकोट तालुक्यात आमदार प्रणिती शिंदे यांचा झंझावात.!
गुरववाडी येथे सरपंच माळप्पा पुजारी व ग्रामस्थांकडून भव्य स्वागत व सत्कार..
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ. प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन जनतेच्या समस्या जाणुन घेतल्या.
यावेळी प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे प्रचंडे हायस्कूल गुरववाडी फाटा येथे आले असता त्यांचे गुरववाडीचे सरपंच श्री माळाप्पा पुजारी व गुरववाडी ग्रामस्थ तर्फे भव्य सत्कार व स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशातील हुकूमशाही मोदी सरकारच्या धोरणामुळे महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, बी बियाणे, खते, औषधी यांचे प्रचंड वाढले. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. पाण्याचे नियोजन नाही, दुधाला दर मिळत नाही, विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सोरेन यांना अटक करतात, विरोधी पक्षाचे खाते सिल करतात, विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू देत नाहीत, निलंबित करतात, ही लोकशाही आहे की हुकूमशाही.?
अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत माडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत उभी आहे. यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. सोलापूर लोकसभेतील पहिली महिला खासदार होण्यासाठी आपण संधी द्यावी, अशी विनंती प्रणिती यांनी केली. दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment