Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, March 4, 2024

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण - सोलापूर जिल्हा ग्रामीण व शहरात बालकांचा उत्तम प्रतिसाद,

 


सारा न्यूज नेटवर्क - 

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण  - सोलापूर जिल्हा ग्रामीण व शहरात बालकांचा उत्तम प्रतिसाद, 

( सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील ९१ टक्के बालकांना पोलिओ लसीचा लाभ )

आरोग्य विभागा सोबत मेडिकल व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी बालकांना पाजली पोलिओ लस..

सोलापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासन , सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण  मोहिमेअंतर्गत  रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी सोलापूर जिल्ह्यातील  नागरी , ग्रामीण व शहरी भागात मा. पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील , मा . आरोग्यमंत्री , ना. तानाजी सावंत , मा. जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद  व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, मनीषा आव्हाळे यांच्या  मार्गदर्शनाखाली  सदर मोहीम पार पाडण्यात आली .

 सोलापूर जिल्ह्यातील  ग्रामीण भागातील माळशिरस तालुक्यात सहाय्यक संचालक , कुटुंब कल्याण , पुणे  डॉ ढवळे  यांनी लसीकरण  मोहिमेचे उद्घाटण करण्यात आले.  डॉ संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी ,  जिल्हा परिषद , सोलापूर यांच्या हस्ते तुंगत  तालुका पंढरपूर  , येथे  उद्घाटण  करण्यात आले . जिल्हा शल्य चिकित्सक  , डॉ सुहास माने  यांनीही  बालकांना  पोलिओ  लसीचे  दोन थेंब पाजून  पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ केला  .   


शिक्षक सोसायटी बुद्ध विहार येथे गौरीताई टिळक नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी बालकांना पोलिओ लस पाजतानाचा क्षण. 
तेथील नागरिकांनी या पोलिओ लसीकरण बद्दल आपली प्रतिक्रिया दिली . 

जिल्ह्यातील ग्रामीण , नागरी भागातील  पाच वर्षाखालील एकूण ३४२८०७  बालके असून  ग्रामीण भागात एकूण २४१८  आणि नागरी भागात २१० लसीकरण केंद्र  , ११९ मोबाईल टीम ,  १२० ट्रान्झीट टीम स्थापन  करण्यात आले होते . सोलापूर जिल्ह्यात ९१ टक्के ( ३१११४३ ) बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली . उर्वरित बालकांना  ५ मार्च २०२४ ते ७ मार्च २०२४ या  तीन दिवसात आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ता , अंगणवाडी कार्यकर्ता यांचेमार्फत  घरोघरी , वाडी वस्ती , उसतोड टोळी , वीट भट्टी इत्यादी ठिकाणी भेट देऊन लस पाजण्यात येणार आहे . 

लक्ष्मी मार्केट मध्ये भाजी व फळ विक्रेते यांच्या बालकांना पोलिओ लस पाजताना शेट गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयचे विद्यार्थी.. 

सदरची मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरावरून सहाय्यक संचालक कुटुंब कल्याण पुणे  डॉ. ढवळे  ह्या सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर  आहेत . राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण   मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले , जिल्हा शल्य चिकित्सक , सुहास माने , जिल्हा मात बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ एस पी कुलकर्णी  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक /  जिल्हा आयुष अधिकारी विलास सरवदे , जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख  , जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचारी आणि जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी  , आरोग्यवर्धिनीचे वैद्यकीय अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ता , अंगणवाडी कर्मचारी तसेच विविध मेडिकल अणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, जिल्हा परिषदचे  व शासनाचे  विविध विभागातील  अधिकारी  व कर्मचारी यांनी  विषेश परिश्रम घेतले. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment