सारा न्यूज नेटवर्क -
केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत *एक पेड मां के नाम* उपक्रम..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापुरातील वसुंधरा महाविद्यालय येथील परिसरात वृक्षारोपण करून शिक्षण परिषद यांनी हरित महोत्सव साजरा केला.
मनपा केंद्र शाला क्रं.28 च्यावतीने केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मध्ये मनपा प्रशासनाच्या वतीने शैक्षणिक विषयांच्या अनुषंगाने कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत शासनाचे *एक पेड मां के नाम*, नवभारत साक्षरता कार्यक्रम, UDISE कामकाज,विद्यार्थी सुरक्षा समिती, अमृतवृक्ष ॲप,राष्ट्रीय मतदार जागृती असे विविध प्रशासकीय विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.
सदर कार्यशाळेत सौ.रजनी राऊळ मॅडम पर्यवेक्षिका मनपा प्राथ शिक्षण मंडळ सोलापूर,परमेश्वर सुतार केंद्रीय मुख्याध्यापक यांनी वरील विषयाबाबत रोप लावून ते ऑनलाइन माहिती भरण्याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी श्री अंबादास पांढरे मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद प्रशाला, पोपट उमाप केंद्रीय मुख्याध्यापक रामवाडी, इको क्लब चे पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर , गौरीशंकर नारायणे,जनार्दन चव्हाण, केंद्रांतर्गत 50 शाळांचे मुख्याध्यापक व सहशिक्षक या कार्यशाळेत उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. अमृत वृक्ष ॲप या शासनाच्या वेबसाईटवर देखील नोंद करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment