सारा न्यूज नेटवर्क -
कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये ‘जागर नारीशक्तीचा: ती चे विधी कवच’ उपक्रम उत्साहात साजरा..
सोलापूर, दि. १५ ऑक्टोबर : - श्री. ऐ. प. जैन पाठशाळा संचलित, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर येथे बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाच्या ‘जागर नारीशक्तीचा: ती चे विधी कवच’ कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर, व कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर यांच्या सयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे हे होते, तसेच मा. अँड. राही पवार व प्रचिता जोगदांडे हेही उपस्थित होते ,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन बोंदार्डे होते.
अँड.राही पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये पॉस्को कायदा, लैंगिक अत्याचार व शिक्षक म्हणून आपली भूमिका यासंदर्भात माहिती दिली. माननीय न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूरच्या माध्यमातून होवु घातलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहोत. हे भावी शिक्षक महाराष्ट्रातील विविध शाळापर्यंत ही माहिती पोहोचतील असा विश्वास व्यक्त केला व त्याचबरोबर पोस्को कायद्याची पार्श्वभूमी, आणि अंमली पदार्थाविषयी असणारा कायदा, त्याचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम, विद्यार्थी व्यसनाधीनतेकडे जाऊ नये या दृष्टिकोनातून शिक्षकांनी घ्यायची खबरदारी या संदर्भात मार्गदर्शन केले॰ तर प्रचिती जोगदांडे यांनी विद्यार्थ्यांनीनां स्वतःचे संरक्षण करण्याचे कौशल्य या संदर्भात मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अश्विन बोंदार्डे यांनी व्यक्त करताना विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन व पोस्को कायद्यासंदर्भात माहिती देण्यापूर्वी शिक्षकाचे चारित्र्य स्वच्छ व सुंदर हवे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समुपदेशन, जनजागृतीचे कार्य करावे, आणि लैंगिक शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये सु-अनुभवातून चुकीच्या सोयीपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.दत्ता वाघमारे यांनी केलेल्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ विद्या भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन सुप्रिया उपरे यांनी केले.


No comments:
Post a Comment