Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, August 10, 2023

तलाठी भरतीच्या तारखा जाहीर - असे करा अभ्यासाचे नियोजन...


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) - : तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा तीन टप्प्यात 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. ☆ पहिला टप्पा - 17, 18, 19, 20, 21, 22 ऑगस्ट ☆ दुसरा टप्पा - 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर ☆ तिसरा टप्पा - 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर - 23, 24, 25 ऑगस्ट तसेच 2, 3, 7, 9, 11, 12 आणि 13 सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

 तलाठी भरती परीक्षेला दिवस कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नोट्स न काढता वाचनावर जास्त भर द्यावा. यामध्ये ग्रामर शब्दसंग्रह, शुद्ध-अशुद्ध शब्द यांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी TCS, IBPS आणि MPSC यांच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेचे जास्त प्रश्न सोडवावेत. त्याचा अभ्यास करावा. तलाठी पदासाठी एकूण 200 गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही रायते यांनी सांगितले. 


राज्यभरातून तलाठी पदाच्या 4466 या पदासाठी 11 लाख दहा हजार 53 उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment