सारा न्यूज नेटवर्क-
सोलापूर(प्रतिनिधी) : - हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयात महाविद्यालयाच्या१८ वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे व एम. व्ही. पी. एम. छात्रालय विद्यार्थी संघटना तसेच डी. एच. बी. सोनी महाविद्यालय व डॉ. हेडगेवार ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे सदस्य डॉ. गिरीश हरकुट यांच्या हस्ते झाले.
रक्तदान शिबिराचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. शिल्पा कुलकर्णी यांनी थॅलेसेमिया या विषयावर माहिती दिली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे सह-सचिव मधुसूदन करवा यांनी केले. याप्रसंगी उपाध्यक्ष गिरधारी भुतडा, ओमप्रकाश सोमाणी, मनोज मर्दा, प्रशांत भुतडा, गोकुळ भुतडा, डॉ. केदार कहाते, डॉ. शिल्पा कुलकर्णी, प्राचार्या डॉ. आशा रोकडे, संचालिका डॉ. वासंती अय्यर, उपप्राचार्या हरदीपकौर बोमरा उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment