सारा न्यूज नेटवर्क -
पुणे (प्रतिनिधी) :- माझे वडील छत्रपती शाहू महाराज यांचे कट्टर समर्थक होते त्यानी आपली विहीर दलितांना पाणी भरणेस खुली केली त्यांचे पाठी राखे सर्व दलित लोकच होते त्यांचा मी वारस मुलगा आहे म्हणून मी महामानव शाहू- फुले - आंबेडकर यांचे विचाराने व मार्गाने आपले बरोबर काम करीत आहे व करीत रहाणार आहे दलित व शोषित वरील अन्याय विरुध्द मी सर्वात पुढे असेन अशी निर्धार व घोषणा श्रीमंत शिवश्री फत्तेसिंह राजे भोसले अध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य यांनी केली. पुणे येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित दलित पँथर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत २६ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आयोजित केली होती
यावेळी दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष श्री आंबादास शिंदे यांनी या सभेत नवीन पदाधिकारी निवड व नियुक्ती सर्वानुमते जाहीर केली यामध्ये - प्रा अपरान्त अरुण कांबळे मुंबई यांची युवा अध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य ; मा प्रकाश पगारे मुंबई यांची सह सचिव दलित पँथर महाराष्ट्र राज्य; मा नरसिंगे सर लातूर यांची उपाध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य ; जे टी जाधव सर बार्शी उपाध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य ; मा सुनील मांडले लातूर जिल्हा अध्यक्ष; अमित कांबळे अध्यक्ष जिल्हा सोलापूर; मा सुरेश कांबळे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा; मा एस जे कांबळे उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा,विश्वास मोहिते संपादक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर अशा १२ जिल्हातील निवड व नियुक्ती करण्यात येऊन नियुक्ती आदेश देण्यात आले यावेळी प्रा रतनलाल सोणाग्रा दलित साहित्यिक ; मा आणा रोकडे अनेकांनी मार्गदर्शन केले.
यावेळी दलित पँथर स्मरणिका संपादक बाबू बनसोडे; बोधी सत्वाचे कथा लेखक बाबू बनसोडे व मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांचेवरील ग्रंथ डाॅ. किर्तीपाल गायकवाड संपादित या तीन पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला; सूत्र संचालन व आभार डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी मानले सुमारे ८० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment