Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, August 13, 2023

मुलींच्या रक्षणासाठी प्रत्येक शाळा कॉलेजात पोलीस काका पोलीस दिदि संकल्पना राबवणार...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी ):-  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा विषय महत्वाचा असून ग्रामीण भागासह शहरी भागातील मुलींना सुरक्षा व त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन वतीने पोलीस काका आणि पोलीस दीदी ही अभिनव संकल्पना येत्या 10  दिवसात जिल्हात राबवणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी माढा येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 


माढा पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने जाधव माढा येथे आले होते तपासणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी  मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असून या संदर्भात आम्ही लक्ष घातले असून पोलीस काका आणि पोलीस दीदी ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यात राबवली जाणार आहे याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे माढा येथे नात्याला कलंक लावणारी घटना घडली चीड आणणारी आहे घटनेचा अजूनही सखोल तपास सुरू आहे गुन्ह्यात वापरलेले साहित्य वाहने जप्त केले असून तपासातून काही नवीन धागेदोरे समोर आल्यास त्या दृष्टीने तपास होईल सामाजिक दृष्ट्या अत्यंत दुर्दैवी असलेल्या घटनेच्या गुन्ह्याची उकल माढा पोलिसांनी अवघ्या 12 तासात केल्याने पोलीस निरीक्षक बी एस खंणदाळे पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद शेख यांच्यासह माढा पोलिसांचे अभिनंदन करून बक्षीस देण्यात आले या उपक्रमामुळे ग्रामीण भागात महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींना दिलासा मिळणार आहे.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment