Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, August 31, 2023

'रायगड न्यूज' चे संपादकाला धमकी, कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

गौसखान पठाण धमकी प्रकरणी

 *कारवाई करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी*

सोलापूर (प्रतिनिधी ) :-  सुधागड जिल्हा रायगड येथील दैनिक रायगड न्यूज चे संपादक गौसखान पठाण यांना धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली आहे या धमकी प्रकरणी गौसखान पठाण यांनी पाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून पत्रकार गौसखान पठाण यांना माघारी पाठवण्यात आले आहे काही दिवसापूर्वी सकाळी शालेय बस मधून फी न भरलेल्या  मुलाला उतरवित असताना पत्रकार गौसखान पठाण यांनी या बाबत विचारणा केली असता तुम्ही यामध्ये पडू नका अशी विनंती अशी विनंती मोटर चालकाने केली होती काही महिन्यापूर्वी पत्रकार गौसखान पठाण यांनी राठोड यांच्या बाबतीत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्या बातमीचा राग मनात धरून रायगड न्यूज चे संपादक गौसखान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, पत्रकारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून पत्रकारिता करायची कशी असा प्रश्न पत्रकारांसमोर निर्माण झाला आहे, 

*पत्रकारांवरील हल्ले धमकी चिंतनीय बाब*

 हल्ली महाराष्ट्र राज्यात रोज कोठे ना कोठे पत्रकारांवर वाळू माफिया गुटखा माफिया भूमाफिया त्याचबरोबर गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बातमी लावण्यावरून  जीवघेणा हल्ला मारहाण धमकी दिली जात असून सदरची बाब पुरोगामी महाराष्ट्राला  शोभणारी नाही, मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून पत्रकार गौसखान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment