Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, August 6, 2023

मोदी सरकारला रोखण्यासाठी बहुजनांनी एकत्र यावे - फतेहसिंह राजे भोसले...


सारा न्यूज नेटवर्क - 

अंबादास शिंदे व शारदाताई शिंदे यांचा अमृतमहोत्सव थाटात संपन् 


सोलापूर(प्रतिनिधी) :- तथागत भगवान बुध्दाचा मानवतेचा विचार झोपायसाचा असेल तर मानवतेला काळीमा फासणाऱ्या मोदी सरकाला रोखण्याची आज गरज आहे . यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्र आल्यास हे सहज शक्य आहे , असे प्रतिपादन छ.शिवरायांचे तेरावे वंशज शिवश्री फतेहसिंह राजे भोसले यांनी केले.

   मातोश्री शरदाताई अंबादास शिंदे मेमोरियल ट्रस्ट वतीने आयोजित केलेल्या अंबादास शिंदे अमृतमहोत्सव समारंभात भोसले बोलत होते. आज "देश बचाव संविधान बचाव" असे म्हणण्याची वेळ आली आहे डॉ बाबासाहेबंची राज्यघटना व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आवाहन करून आपण बुद्धाच्या वाटेवर चालत असल्याचेही भोसलेंनी जाहीर केले. 


कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली तर शारदाताईंच्या प्रतिमेस शुभांगी ताई भोसले यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऐतिहासिक धम्मभूमीचे विकास प्रणेते भीमपुत्र टेक्सास गायकवाड शुभांगी ताई भोसले बिरसा मुंडा संघटनेचे कोकण विभाग प्रमुख राजाभाऊ सरनोबत छ. शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष फारुख शेख आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अंबादास शिंदे हे होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व धम्मरक्षित लिखित स्वागतगीत राजेंद्र निकाळजे यांनी सादर केले तर स्वप्नील पारधे व स्वर्णीमा शिंदे यांचे या बालकांचे भाषण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. सदर अमृतमहोत्सव कार्यक्रमात मातोश्री शरदाताईस समर्पित करणाऱ्या डॉ. किर्तिपाल संपादित धम्मनायिका या गौरव ग्रंथाचे व बाबुराव बनसोडे लिखित बोधिसत्वाच्या कथा या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

  यावेळी टेक्सास गायकवाड यांनी आपल्या भाषणात शारदाताई व अंबादास शिंदे यांचा फुले दाम्पत्या सारखे कार्यरत असणारे समाजसेवक असा उल्लेख केला तर प्र. अप्रांत कांबळे राजाभाऊ सरनोबत व फारुख शेख यांनीही शिंदे सर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपल्या भाषणात घेतला. यावेळी अनेक संस्था संघटनेच्या वतीने शिदे सरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ किर्तिपाल यांनी केले तर आभार राजीव शिंदे यांनी मानले , कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्ट चे पदाधिकारी डॉ. विजया महाजन सचिन दिलपाक शिरीष सितासावद अशोक दिलपाक कुणाल दिलपाक राजीव शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले या समारंभास जेष्ठ आदिवासी नेते मच्छिंद्र भोसले बाळासाहेब सरवदे केरू जाधव कल्याण श्रावस्ती अक्षय बबलाद या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातून शिंदे सरांवर प्रेम करणारे असंख्य विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment