Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, August 21, 2023

सोलापूर लोहमार्ग पोलीसांची दमदार कामगिरी, एकुण 18,80000/ रुपयेचा (मोबाईल व दागिने) मुद्देमाल फिर्यादीना केले परत...

 


सारा न्यूज नेटवर्क 

७ लाख ३० हजार रूपयाचे मोबाईल व ११ लाख ५० हजार रू. चे सोन्याचे दागीने हस्तगत करून तक्रारदार / फिर्यादी यांना केले परत...


सोलापूर (प्रतिनिधी) :- आज दि. २१/०८/२०२३ सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे मुददेमाल प्रदान कार्यक्रम आयोजीत करून एकुण ४५ मोबाईल त्यात रेडमी कंपनीचे ०४ मोबाईल, रियलमी कंपनीचे १० मोबाईल, विवो कंपनीचे १० मोबाईल, सॅमसंग कंपनीचा ०५ मोबाईल, ओप्पो कंपनीचा १३ मोबाईल, वन प्लस कपनीचा ०३ मोबाईल असा एकुण ०७ लाख ३० हजार रूपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले.





त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान प्रवाशांची ओळख व विश्वासात संपादन करून खाण्याचे / पिण्याचे पदार्थाद्वारे गुंगीकारक औषध देवून बेशुध्द करून प्रवाशांची लुटमार करणा-या टोळीस अटक करून तसेच जबरी चोरी आणि इतर वेगवेगळया चोरीच्या गुन्हयात चोरीस गेलेले ११ लाख ५० हजार रूपयाचे सोन्याचे दागीने संबंधीत गुन्हयातील आरोपीना अटक करून त्यांचेकडून हस्तगत करण्यात आले.


सदरचे हस्तगत केलेले मोबाईल व जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागीने असा एकुण १८,८०,०००/- रूपयेचा मुदद्माल फिर्यादीनां मा. पोलीस अधिक्षक सो लोहमार्ग पुणे श्री. श्रिकांत धिवरे साो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो सोलापूर लोहमार्ग विभाग श्री. चंद्रकांत भोसले सो, सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेचे मा. पोलीस निरीक्षक सो श्री. संतोष गायकवाड मा पोलीस निरीक्षक संगिता हत्ती मॅडम, सपोनि एम जे गुरव सो यांचे हस्ते मुददेमाल प्रदान कार्यक्रमातंर्गत तकारदार / फिर्यादी यांना परत देण्यात आले आहे. नमुद कार्यक्रमास पत्रकार बंधु व भगिनी, सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेकडील पोलीस  अधिकारी व अंमलदार हे हजर होते. 

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीसनिरीक्षक सो श्री. संतोष गायकवाड, सपोफौ संजय जाधव, पो हवा प्रमोद सुरवसे, पो कॉ यशवंत जमादार, पो कॉ प्रसाद गायकवाड यांनी केली आहे.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment