सारा न्यूज नेटवर्क -
मुंबई (प्रतिनिधी) :- आज राष्ट्रीय पुरस्कार २०२३ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्या अभिनेता अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला जाणून घ्या...
कलाविश्वातील सर्वाधिक मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. आपल्याला हा पुरस्कार मिळावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. त्यामुळे कोणत्या कलाकारांनी या पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरले याकडे सर्वांचे लक्ष होते. चला पाहूया विजेत्यांची यादी.
पुरस्कार विजेत्यांची यादी-
सर्वोत्कृष्ट हिंदो सिनेमा- सरदार उधम
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी- आरआरआर (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा
सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनॉन (मीमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- अल्लू अर्जून (पुष्पा)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन ( गोदावरी )
सर्वोत्कृष्ट चित्रपट- 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट'
६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत पुरस्कार विजेत्यांची यादी जाहिर करण्यात आली. यंदा दाक्षिणात्य चित्रपटांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनचा पुरस्कार हा मराठी चित्रपट गोदावरीचा दिग्दर्शक निखिल महाजनला देण्यात आला आहे. गेल्यावर्षी देखील राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी बाजी मारली होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment