सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूरच्या विनायक ची विशेष कामगिरी.
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर चे सुपुत्र विनायक ओंकारनाथ गाये सोलापूरहून कारगील येथील वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि.१३.०६.२०२३ रोजी निघून लेह-लडाख पर्यंत रॅायल एनफिल्ड इंटरसेप्टर मोटर सायकलवरून ६६०० कि.मी. प्रवास पूर्ण केला. प्रवास मार्ग - सोलापूर - धुळे - इंदोर - जयपूर - पठाणकोट - श्रीनगर - कारगिल शहिद स्मारक - लेह-लडाख - मनाली - चंदीगढ - अजमेर - उजैन - नाशिक - सोलापूर. दि. २९.०६.२०२३ रोजी सोलापूरला परत आले.
सोलापूर ते लडाख मोटर सायकलवरून एकट्याने प्रवास करून येणारा विनायक हा सोलापूर जिल्ह्यातील पहिला तरूण आहे. विनायक गाये हा महावितरण मधील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, झोन पदाधिकारी ओंकारनाथ गाये यांचा मुलगा आहे.
ही सोलापूर साठी खूप गौरवाची बाब आहे, त्याच्या या कामगिरीबद्दल सर्व स्थरारातुन कौतुक होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment