Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, August 17, 2023

गुरववाडी(अक्कलकोट) येथे ७६ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्तुत्य उपक्रम संपन्न...

 


 

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त व कै चिनप्पा पुजारी माजी सरपंच गुरववाडी यांच्या स्मरणार्थ दि.१४ ऑगस्ट२०२३ रोजी मौजे गुरववाडी ग्रामपंचायत कार्यालय  अक्कलकोट या ठिकाणी "मेरी माटी मेरा देश" या उपक्रमांतर्गत संस्मरणीय शिला फलकाचे अनावरण शासकीय आदेशाप्रमाणे गुरववाडी ग्रामपंचायत कार्यालयातील प्रांगणात माजी सैनिक शिवानंद शिवशंकर पुजारी व काशिनाथ  बहादुरे यांच्या समवेत गुरववाडीचे विकासरत्न तथा माजी सरपंच म्हाळप्पा पुजारी व  गुरववाडीच्या विद्यमान महिला सरपंच सौ. लक्ष्मी माळाप्पा पुजारी यांच्या शुभहस्ते नाम फलकाचे अनावर करण्यात आले.




कार्यक्रमाच्या प्रारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आले. तसेच याप्रसंगी झेंडावंदन लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. 


तदनंतर गुरव समाज स्मशानभूमी नाम फलकाचे अनावरण गुरववाडीचे माजी सरपंच बसवराज बाबू देवरमनी जी.के.मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर संस्थापक अध्यक्ष संतोष (दादा)गायकवाड,ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज (दादा)गायकवाड,सारा न्यूज नेटवर्क चे संपादक राम हुंडारे, लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंत देडे,दैनिक लोकमत या वृत्तपत्राचे वार्ताहर अजित राठोड आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.




यावेळी स्मशानभूमी लगत विविध प्रकारच्या ५१ झाडांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 



तदनंतर गुरववाडी येथील सामाजिक कट्ट्यावर उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील मंजूर एकूण १८ लाभार्थ्यांना मंजूर आदेश प्रमाणपत्राचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 



कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच म्हाळाप्पा पुजारी डॉ. काशिनाथ मुदगी,मेजर शिवानंद फुलारी यांनी मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त केले,तसेच प्रमुख मान्यवरांनी देखील गुरववाडी गावच्या विकास कामासंदर्भात माजी सरपंच माळाप्पा पुजारी यांचे कौतुक केले व त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मनोगत व्यक्त करताना शिवराज (दादा)गायकवाड व संतोष दादा गायकवाड यांनी  गुरववाडी गावच्या विकासासंदर्भात तसेच पुजारी परिवारासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी माजी उपसरपंच कल्याणी रावजी, ग्रामपंचायत सदस्य मल्लिकार्जुन इंगळगी पोलीस पाटील सिद्धलिंग मुनाळे, ग्रामसेवक के.जी मकानदार उपसरपंच जगदेवी स्वामी,श्रीमंत पुजारी,खोबणा जेजुरी,सूर्यकांत देवरमनी,मायाप्पा पुजारी, बाबू वंकारी संगप्पा आलोरे,बेगेश मोती बसव्वा यमाजी,भारताबाई कोळी,सुगलाबाई भरमशेट्टी, सरदार इंगळगी,काशिनाथ कलबुर्गी,काशीबाई बबलाद,चंद्रशेखर आळगुंडे,तंटामुक्त अध्यक्ष श्रीमंत वंकारी,रंगनाथ विंचुरे,अंगणवाडी सेविका अंबाबाई फुलारी,निलाबाई मुंडेवाडी, सारिका वंकारी,जिल्हा परिषद कन्नड व मराठी शाळा गुरववाडी येथील मुख्याध्यापक अशोक चव्हाण सर,राजू चौगुले,कडचे सर,गगोंडा सर,अनिता मोती, सुखदेऊ लोणी,गणेश सुरवसे, सागर हुंडारे, गुरववाडी ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी गुरुशांत सावळी यांच्या समवेत गुरववाडी पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment