सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- माझी माती माझा देश वसुंधरा अभियान सोलापूर पोलीस मुख्यालय ग्रामीण येथे औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले, 🌳
सोलापूर पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपाधीक्षक विजयालक्ष्मी कुरी मॅडम यांच्या आयोजन तसेच राखीव पोलीस निरीक्षक प्रकाश शिंदे सर व सर्व पोलीस बांधव यांच्या नियोजनाने तसेच डॉ महेंद्र गागरे हरित मित्रपरिवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 🌳
त्याच बरोबर इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले उपस्थितीत इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ. मनोज देवकर पर्यावरण यांनी सर्व प्रकारचे औषधी वनस्पती उपलब्ध करून दिले इको नेचर क्लबचे अनिता पवार सुनील वाघमारे निसर्ग देवकर सृष्टी देवकर आदी उपस्थित वृक्ष लागवड व प्रबोधनात्मक कृतिशीलता आज माझी माती माझा देश हा अभिनव उपक्रम वृक्ष लावून मातीला वंदन करून समर्पित करण्यात आला🌳
तसेच आदरणीय पोलीस उप आधीक्षक विजयलक्ष्मी कुरी मॅडम यांच्या हस्ते मान्यवरांचा पर्यावरण पूरक भेट देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला🌳
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment