Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, August 17, 2023

महावितरण कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा...


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- महावितरण सोलापूर शहर ई उपविभाग येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा. श्री. प्रदीप मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.


राष्ट्रगीताने तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आली. मिठाई वाटून स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप मोरे यांनी कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगून, विना अपघात व चांगली ग्राहक सेवा देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. 


स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाखा कार्यालय औद्योगिक वसाहत येथे वृक्षारोपण करण्यात आले.



 

 स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे, उपविभागातील सहाय्यक अभियंता पुंडलिक कुंभार, एन. टी. मुजावर, प्रेम राठोड, अजिंक्य कुलकर्णी, कोमल सुरवसे, सुनंदा माशाळ, उपविभागातील कर्मचारी निलकंठ कांबळे, श्रीराम सलवदे, रमेश कुंभार, किरणकुमार इरनाळे, नागराज सोनवणे, अमरनाथ शिंदे, जुल्फिकर शेख, अमोल धायगुडे, संतोष कुंभार, किर्तीकुमार वेळापुरे, एम.एम. करजगीकर, सोमनाथ कारंडे, लक्ष्मीकांत अचलेरे, दीपाली कांदे, दत्तात्रय गुंड, उमेश शेवाळकर, सतीश बिराजदार, मीनल भोसले, रम्या कुंजुकुंजु, नंदकुमार मार्तंड, धानप्पा यादवाड, ईश्वर वळवी, रोहिदास डांगे, प्रदीप मुलादी, श्रीशैल विजापूरे, मल्लिनाथ मुन्नोळी, विनोद राऊत, नितीन कोळी, नबील शेख, अपेक्षा बहादुरे, संभाजी रुपनर, चंद्रकला शिंदे, सचिन कानडे, केदार सुतार, नागनाथ सासवे तसेच उपविभागातील इतर जनमित्र, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment