सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- स्वामी विवेकानंद प्रशाला जुळे सोलापूर येथील मोकळ्या परिसरात "एक राखी एक झाड" हा संकल्प करून झाड लावून प्रत्येक झाडाला राखी बांधून झाडांचं वसुंधरे मातेचे संरक्षण करण्याचे व्रत धरून राखी बांधण्यात आली.
यावेळी उपस्थित स्वामी विवेकानंद प्रशालेचे व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य श्री अंबादास पांढरे सर, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक श्री कृष्णा सुतार सर, इको नेचर क्लब चे संस्थापक मनोज देवकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका आणि इतर कर्मचारी वर्ग आदी उपस्थितीत होते.
त्या अनुषंगाने वृक्ष लागवड करून त्यांना राखीव बांधून वृक्ष संवर्धन करण्याचे संकल्प करण्यात आला. इको नेचर क्लबचे अध्यक्ष पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांनी बेल व फळांची रोपे उपलब्ध करून दिली, तसेच प्रबोधनात्मक त्यांनी आव्हान ही करण्यात आलं की प्रत्येकाने रक्षाबंधना दिवशी एक झाड लावून एक राखी बांधून प्रत्येकाने पर्यावरण जतन करण्याचा संकल्प करावा असे आव्हान करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment