Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, August 29, 2023

रक्षाबंधन निमित्त भेट : देशात गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त...

सारा न्यूज नेटवर्क - 

गॅस सिलेंडरवर मिळणार 400 रुपयांचे अनुदान 

नवी दिल्ली : उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना आता गॅस सिलेंडरवर 400 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. आधी 200 रुपयांची सब्सिडी दिली जात होती. त्यामध्ये आज कॅबिनेटने 200 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 400 रुपये तर इतर ग्राहकांना 200 रुपयांनी स्वस्त सिलेंडर मिळणार आहे. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 14 किलो वजनाच्या सिलिंडरसाठी लागू असेल. तर त्या बदल्यात इंधन कंपन्यांना केंद्र सरकार अनुदान देणार असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. मध्यमवर्गीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण गेल्या काही महिन्यांपासून जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड चढे राहिले आहेत. एलपीजीच्या दरात कपात केल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 14 किलोच्या एलजीपी सिलेंडरची सध्याची किंमत सुमारे 1,100 रुपये आहे. चार अंकी असलेली ही किंमत केंद्राच्या निर्णयामुळे तीन आकड्यांवर येऊ शकते. प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेंतर्गत 200 रुपये अतिरिक्त अनुदान मंजूर केल्याचे समजते. अतिरिक्त सबसिडीमुळे घरगुती एलपीजीच्या किमती प्रति सिलेंडर 200 रुपयांनी कमी होतील. त्याबाबतची अधिकृत घोषणा रक्षाबंधनाच्या दिवशी होणे अपेक्षित आहे. 


वाचकांच्या माहितीसाठी असे की, मार्चच्या आधी, CCEA द्वारा प्रति वर्ष प्रति 14.2 किलोच्या 12 सिलिंडरसाठी 200 रुपये सबसिडी मंजूर केली होती. हा लाभ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना देण्यात येणार होता. उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी एका वर्षात एकूण 12 स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी घेऊ शकतात. 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मोफत देते. सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक एलपीजी कनेक्शनशी लिंक करावा लागेल.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment