Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, August 7, 2023

G.K.मागासवर्गीय बहुउद्देशीय संसोधन संस्थेचा ७ वा वर्धापन दिन मोठया थाटात संपन्न...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

६ ऑगस्ट,२०२३ वार-रविवार 

सोलापूर (प्रतिनिधी) :-  सालाबादप्रमाणे याही वर्षी G. K. मागासवर्गीय बहुउद्देशिय संसोधन संस्थेचा ७वा वर्धापनदिन कार्यक्रम व समाजसेवक कै. शिवप्पा नागप्पा गायकवाड यांच्या११व्या  पुण्यतिथीनिमित्त विधायक उपक्रम समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक सोलापूर येथे आयोजित करण्यात आले.सदर वर्धापनदिनानिमित्त निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे मंजूर अनुदान पत्राचे वाटप,समाजातील निराधार भगिनी कतृत्वान महिलांचा सत्कार समारंभ व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.



वर्धापनदिन कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकर चळवळीत जेष्ठ नेते तथा गवई गटाचे प्रदेश अध्यक्ष सुबोधजी वाघमोडे, ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज(दादा)गायकवाड, डॉ.समीर पटेल(MBBS), सुवर्णराज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा(ताई)झाडे-खेळबुडे, सा.उपेक्षितांचे व्यासपीठ संपादक वैजिनाथ बिराजदार, सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे आदी उपस्थित होते.




प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तद्नंतर  उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष(दादा) गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष(दादा) गायकवाड यांनी केले.






गेल्या ६ वर्षामध्ये संस्थेने आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, दिवाळी फळराचे वाटप, महापुरुषांची जयंती उत्सव तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनेचा ४०० लाभार्थ्यांना अनुदान मिळवून देण्याचे काम संस्थेने केले आहे. समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीना मुद्रा योजने अंतर्गत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी विविध सहकारी बँकेचे ३५ लाभार्थ्यांना मुद्रा योजनेतून कर्ज मंजूर करुन देवून  सक्षम केले आहे. तसेच समाजसेवक कै. शिवप्पा नागप्पा गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व संजय गांधी श्रावण बाळ योजनेतील एकूण १२ लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले.



यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगतरूपी विचार व्यक्त केले व संस्थेच्या ७व्या वर्धापन दिनानिमित्त व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

निराधार महिला भगिनी व गरजू महिलांना भेट म्हणून साड्या वाटप केल्या.यावेळी कार्यक्रमास मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.





कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी युवा नेतृत्व सुजल गायकवाड सहसचिव ज्ञानेश्वर पवार, कार्याध्यक्ष महेश उंबरगीकर, गणेश सुरवसे गणेश जानकर. ईश्वर बेलभंडारे विष्णु कांबळे यांनी परिश्रम घेतले. 
तसेच या कार्यक्रमास महिला भगिनी सुरेखाताई सलगर सुनिता बडवणे संगीता कांबळे शशिकला पवार नजीरा शेख विद्या सलगर कविता बायस सरोज जमादार कांबळे ताई लक्ष्मीबाई सलगर प्रभावती निचळ स्मिता विभुते राजश्रीताई जाधव  निर्मला इंगळे पद्मा मोळक सुभाष इंगळे रमाकांत गणेशकर यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ भडकुंबे यांनी केले तर आभारसंतोष(दादा) गायकवाड यांनी मानले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment