Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, August 19, 2023

सोलापूरात मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती...




सारा न्यूज नेटवर्क

 सोलापूरात मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

सोलापूर (प्रतिनिधी) :- भारताच्या कायद्यांतर्गत मानव अधिकार संरक्षण अधिनियम ( 1993 ) मध्ये नमूद असलेल्या मानवी हक्काच्या संरक्षणासाठी सादिक शेख यांनी मानव अधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र या नावाने मानवाधिकार संघटनेचा स्थापना केली आहे या संघटनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्तीचा कार्यक्रम सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी पार पडला.


यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटना सोलापूर शहर उपाध्यक्षपदी अजहरुद्दीन बिजापुरे व उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग शहर अध्यक्षपदी नसिरुद्दीन इनामदार व तसेच शहर सोलापूर प्रतिनिधी म्हणून समीर शेख, मिनाज इंगलगी परवेज मुल्ला, यांची नियुक्ती करण्यात आली. 



या कार्यक्रमात पत्रकार सुरक्षा समितीचे शहर कार्याध्यक्ष अन्सार तांबोळी ( B.S ) यांचा देखील सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात मानवाधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, मानव अधिकार संरक्षण संघटनाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख महबूब कादरी, जुबेर शेख, जमीर भोलू, चाचा कुरेशी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात मानवाधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख बोलताना म्हणाले की या संघटनेचे स्थापना करण्याचा उद्देश मानव अधिकार चा प्रचार व प्रसार करणे गरीब पिढीत वंचित लोकांना मानवाधिकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत शासकीय दरबारात पत्रव्यवहार आंदोलन उपोषण व निवेदन द्वारे न्याय मिळवून देण्याकरिता काम करणे अनेक ठिकाणी महिला वर होणारे अत्याचार रोकने व त्याचबरोबर भ्रष्टाचारला आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे मानवाधिकारचे शिबिर घेणे आरोग्यासाठी शिबिर घेणे रक्तदान नेतृत तपासणी व अनेक सामाजिक कार्य तसेच मानवांच्या हितासाठी अनेक उपक्रम करणे शासकीय योजनेचा प्रचार व प्रसार करणे माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत अनेक शासकीय दरबारात माहिती अधिकाराखाली लोकांना जनजागृती करणे अशा अनेक शिबिर व उपक्रम करून मानवाधिकाराच्या हितासाठी ही संघटना भविष्यात पूर्ण महाराष्ट्रभरात काम करणार आहे अशी गवाही या कार्यक्रमात त्यांनी दिली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment