Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, August 11, 2023

डॉ शिवशंकर खोबरे यांना "नीमा स्टार" पुरस्कार मिळाल्याने हॉस्पिटल स्टाफ कडून सत्कार संपन्न...



सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापुरातील नामवंत डॉ. शिवशंकर खोबरे यांना नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकलअसोसिएशन (नीमा) यांचे कडून वैद्यकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल "नीमा स्टार" पुरस्कार मिळाला आहे.


डॉ. शिवशंकर खोबरे हे सोलापुरातील खोबरे हॉस्पिटल येथे गेली 20 वर्षापासुन वैद्यकीय सेवा बजावत आहेत, ती वैद्यकीय सेवा करताना त्या सोबत सामाजिक बांधिलकी जपत ते समाजातील वंचित पिढीत तसेच गोरगरीब यांच्या साठी ते अविरतपणे आपली सेवा करत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून डॉ शिवशंकर खोबरे यांना निमा सुपर हीरो पुरस्कार देण्यात आला त्या अनुषंगाने खोबरे हॉस्पिटल येथे हॉस्पिटल च्या स्टाफने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी डॉ खोबरे यांनी केक कापून सत्कार उस्तव साजरा केला.


या प्रसंगी डॉ स्मिता खोबरे, रजनी मामडयाल, वर्षा बनसोडे, जयलक्ष्मी बुक्का, ज्योती होले, पूजा मुशान, निकिता मलकापुरे, प्रिया मोरे, पूजा जोकारे, माधुरी राऊत, माया माने, उषा जाधव, विठ्ठल देशमुख आदी हॉस्पिटल मधील स्टाफ उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment