Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, August 19, 2023

अरे व्वा : कलेक्टर साहेब मिटिंगला आलेल्या लोकांना अंगठी व लॉकेट गिफ्ट देणार आहेत...

        



सारा न्यूज नेटवर्क - 

कलेक्टरच्या गाडीवर ड्रायव्हर आहे असे सांगत,सोनाराची फसवणूक

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरातील एका सोने चांदीच्या व्यापाऱ्याची ठगांनी फसवणूक करत १ लाख 33 हजारांची फसवणूक केली आहे. ८ अंगठ्या व दोन लॉकेट लंपास केले आहे. विशेष म्हणजे ठगांनी सोनाराला भूलथापा मारत मी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे,जिल्हाधिकारी हे,मिटिंगसाठी आलेल्या लोकांना अंगठी लॉकेट गिफ्ट देत आहेत. असे सांगून सोनाराला अंगठ्या लॉकेट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात बसवून सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात अयाज मकबूल मुल्ला यांनी फिर्याद दिली असून संदीप वाघमारे या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास एपीआय देशमुख करत आहेत. ही घटना १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११. ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.


मी कलेक्टर ऑफिस मध्ये ड्रायव्हर आहे,मला अंगठ्या हवे,मिटिंग मध्ये गिफ्ट द्यायचे आहे - फिर्यादी अयाज मुल्ला यांचे सोलापूर विजयपूर महामार्गावर निहाल ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. अयाज मुल्ला यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संदीप वाघमारे नावाचा इसम माझ्या दुकानात आला,आणि जिल्हाधिकारी यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. जिल्हाधिकारी साहेब मिटिंगला आलेल्या लोकांना सोन्याचे अंगठ्या व सोन्याचे लॉकेट गिफ्ट देणार आहेत. तुम्ही अंगठ्या आणि लॉकेट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन चला असे सांगितले. दुकानाबाहेर आलिशान वाहन आणि त्यामधील बसलेल्या सुटाबुटातील व्यक्तिने हात करून चला असा इशारा दिला. त्यामुळे सोनार अयाज मुल्ला यांना विश्वास बसला,आणि ८ सोन्याच्या अंगठ्या तीन सोन्याचे लॉकेट असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज घेऊन निघाले.


ठगानी सोनाराला जिल्हाधिकारी कार्यालयात बसवले आणि सोन्याचांदीचा ऐवज घेऊन लंपास झाले - सोन्या चांदीचे व्यापारी अयाज मुल्ला यांना सोन्या चांदीच्या ऐवजासह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले. वेटिंग कार्यालयात बसवून जिल्हाधिकारी यांना सॅम्पल दाखवून आणतो असे सांगून,दोन्ही ठगांनी सोन्या चांदीचा ऐवज घेऊन गेले. सोनार अयाज मुल्ला हे खूप वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात ताटकळत बसून होते. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अयाज मुल्ला यांना विचारले काही काम आहे का,त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. आपली फसवणूक झाल्याची बाब समोर आल्यानंतर सोनार अयाज मुल्ला यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment