सारा न्यूज नेटवर्क -
चार हुतात्मा पुतळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसरातील सुशोभीकरणाचे लोकार्पण..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा पुतळा या सुशोभीकरणाचे कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा श्रीकिसन सारडा,हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा अ.कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत (दादा)पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचे वंशज श्रीमती अन्नपूर्णा धनशेट्टी व हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचे नातू महादेव दीनानाथ शिंदे तसेच हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे वंशज (मुलीचा मुलगा)हसीमोद्दीन शेख यांचा सन्मान पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नरेंद्र काळे, नगर अभियंता सारिका आकूलवार, उपअभियंता किशोर सातपुते, कनिष्ठ अभियंता परशुराम भुमकंटी, बिरू बंडगर, विजयकुमार गावडे, गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर राजेश मुंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री यांच्या हस्ते गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर राजेश मुगळे यांचा सत्कार संपन्न...
यावेळी या पुतळा सुशोभीकरणाचे काम अत्यंत चांगल्या व सुंदर प्रकारे केले असे गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर राजेश मुगळे यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त शीतल उगले व भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, नगर अभियंता सारिका आकूलवार, उपअभियंता किशोर सातपुते, कनिष्ठ अभियंता परशुराम भुमकंटी, बिरू बंडगर, विजयकुमार गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment