Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, January 8, 2024

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्हा आयोजित प्रशिक्षण शिबीर संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क -

सोलापूर जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आयोजित प्रशिक्षण शिबीर संपन्न..

सोलापूर (प्रतिनिधी) :- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्हा च्या वतीने माहिती अधिकार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

दिनांक 07/01/2024 रोजी सकाळी 11 ते 5 दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कडून म्हस्के हॉस्पिटल, पंढरपुर रोड संभाजी नगर, मोहोळ जि-सोलापूर येथे यशस्वी पणे पार पडले. या शिबिरासाठी सोलापूर जिल्हय़ातून मोठया संख्येने माहिती अधिकार कार्यकर्ता उपस्थित होते.


या प्रशिक्षण शिबिरात सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश सुळे यांनी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचा हेतू काय आहे आणि सर्वांना हे प्रशिक्षण का महत्वाचे आहे हे समजावून सांगितले. 

त्यांच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय किणीकर स्वामी यांनी माहिती अधिकार कायद्याच्या चौकटीत राहून कशाप्रकारे या कायद्याचा उपयोग समाजासाठी करता येईल ते समजावून सांगितले, तसेच शासकीय कार्यालये येथील भ्रष्टाचार रोखण्यासाठी या माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे असे सांगितले. माहिती अधिकार अधिनियम 2005 चे विविध कलम कोणते आहेत त्याची माहिती या प्रशिक्षण शिबिरात दिली. 

माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती मागवताना, कशा प्रकारे अडचणी येतात आणि ते कसे सोडवायचे हे समजाऊन सांगितले. माहिती अधिकाराचा फार्म कसा भरावा आणि कोणकोणत्या प्रकारचे फार्म असतात आणि ते कसे भरायचे हे खुप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. 

अँड गणेश वगरे यांनी माहितीचा अधिकार वापरून माहिती मागवताना काय अडचणी येतात त्या कायद्यांची अंमलबजावणी कशी केली जाते, असे विविध कायदे विषयक माहिती दिली.

 https://www.saranewsnetwork.in/2024/01/blog-post_8.html

कार्यक्रमाची सांगता माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ /फेडरेशन 2024 चे कॅलेंडर प्रकाशित करून झाली. आणि सर्वांना कॅलेंडर देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. 


यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय किनीकर स्वामी, जिल्हाध्यक्ष योगेश सुळे,  पश्चिम महाराष्ट्र संघटक सत्यजित मस्के, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख भारत साळुंखे, , जिल्हा महिला अध्यक्ष दिपाली स्वामी, संघटक दत्ता पवार, ,कार्याध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हा सरचिटणीस बाळकृष्ण सदाफुले, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हिप्परगे, जिल्हा विधी सल्लागार ॲड गणेश वगरे, शहराध्यक्ष श्रीकांत कोळी, उपसंघटक राम हुंडारे, प्रसिद्धीप्रमुख राजरत्न बाबर, महिला संघटक, कामिनी जाधव अनिता कलशेट्टी, चैताली नाईक, हनुमंत कौलगे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment