सारा न्यूज नेटवर्क -
चर्मकार समाज्याचे सरसकट कर्ज माफ करावे-
संत रविदास चर्मकार युवा महासंघ ( महाराष्ट्र राज्य )
पुणे (प्रतिनिधी) :- श्री. धम्म ज्योती गजभिये साहेब यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री दत्ताभाऊ कदम संस्थापक अध्यक्ष तसेच दत्तात्रय डोईफोडे महाराष्ट्र राज्य खजिनदार संत रविदास चर्मकार युवा महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने साहेब चे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यानिमित्त समाजाच्या अनेक प्रलंबित विषयावर चर्चा, व निवेदन देण्यात आले...
महत्वाच्या मागण्या
१) संत रोहिदास समाज कल्याण व केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य संयुक्त मार्फत देण्यात आलेले कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, व नवीन कर्ज देण्यात यावे.
०२) गटई कामगारांना गटई स्टॉलच्या बरोबर पाचशे रुपये भांडवल स्वरूपात दिले जाते या रक्कम मध्ये वाढ करून वीस हजार रुपये देण्यात यावे,
अशा अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली, तसेच गजभिये साहेबांनी चर्मकार समाज योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना यामध्ये 50 टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, प्रशिक्षण योजना, गटई स्टॉल योजना, मुदती कर्ज योजना, सुक्ष्म पत पुरवठा योजना, महिला समृध्दी योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक कर्ज योजना, नारी आर्थिक सशक्तीकरण योजना (NASY)
व्होकेशन एज्युकेशन अँड ट्रैनिंग लोन योजना (VETLS) अश्या अनेक महत्वाच्या योजना यांचा कसा आणि कोणत्या प्रकारे लाभ घेता येईल याबद्दल माहिती देऊन आमच्या कडून ज्या प्रकारची मदत सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करू असे आश्वासन देऊन पुढील समाजाच्या महत्वाच्या मागण्यासाठी संस्थापक अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ कदम यांना मुंबई समाजकल्याण ऑफिस ला भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले...
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment