Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, January 27, 2024

ग्रीन हॉरिझोन गार्डन मॉलचे बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते शानदार उद्घाटन...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ग्रीन हॉरिझोन गार्डन मॉलचे बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते शानदार उद्घाटन...

सोलापूर (प्रतिनिधी) :- २६जानेवारी २०२४ रोजी विजापूर रोड, किशोर चंडक रेसिडेन्सी येथे ग्रीन हॉरिझोन गार्डन मॉलचे उद्घाटन अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संदीप होटकर, मा. नगरसेवक रमेश होटकर, रघोजी ट्रान्सपोटेशनचे संचालक संजय रघोजी, जैष्ट साहित्यिक नारायण महादेव शिंदे, माजी नगरसेवक विवेक खरटमल, उद्योजक शिवराज कांबळे, डेव्हलपर मनोहर नारायणकर, माजी नगरसेवक विवेक खरटमल, यांनी उपस्थित राहुन रविंद्र शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.




या गार्डन मॉलचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अंगलोनिमा, लकी बांबू, पिसलीली, फायकस, फिडल लीफ, स्नेक प्लॅन्ट, रेड मचेरा,मनीप्लॅन्ट, एक्सोरा,रबर प्लांट,स्विस चीज, बोन्साय झाडे यासारखी अनेक प्रकारच्या पॉटस ठेवण्यात आली आहेत, जी घेण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जावे लागत होते. सोलापूर मध्ये हे गार्डन मॉल सुरू केल्याने गार्डन निसर्ग प्रेमींची चांगली सोय झाली आहे.

या गार्डन मॉल मध्ये सोलापूरातील सर्व गार्डन निसर्ग प्रेमींनी भेट देऊन विविध प्रकारच्या रोपे, कुंड्या, बोनसाय झाडे, इनडोअर व आऊटडोअर प्लॅन्ट ची असंख्य व्हरायटी पाहण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन मॉलचे ओनर रविन्द्र शिंदे यांनी केले आहे.

या कार्यक्रम प्रसंगी नागेश खरटमल ,प्रेरणा शांताराम शिंदे, अंजली जीवनदास इंगळे,समाजसेविका संगीता जोगधनकर, प्रल्हाद होटकर, ज्ञानेश्वर सोनावणे, संतोष कटके आदी मित्रमंडळी उपस्थित होते.

या कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांनी उपस्थित राहुन रविंद्र शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सोबत पत्रकार सुरक्षा समितीचे रवी रणदिवे उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment