Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, January 20, 2024

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते स्वामी समर्थ दिनदर्शिकेचे प्रकाशन*

 


सारा न्यूज नेटवर्क - 

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते स्वामी समर्थ दिनदर्शिकेचे प्रकाशन

२० जानेवारी २०२४ 

अक्कलकोट(प्रतिनिधी) :- येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाकरीता आल्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या थाटात संपन्न झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुंबईच्या कौशल आर्टस् निर्मित श्री स्वामी समर्थ दिनदर्शिकेचे प्रकाशन स्वामींच्या गाभारा मंडपात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख, 

आ.राम सातपूते, आ.राजेंद्र राऊत,

माजी जिल्हाध्यक्ष शहाजी भाऊ पवार, आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी,  तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक मिलनदादा कल्याणशेट्टी, राजकुमार झिंगाडे, मंदार पुजारी, व्यंकटेश पुजारी,  मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, शैलेश राठौर, वैजूनाथ मुकडे आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment