सारा न्यूज नेटवर्क -
तळे हिप्परगा येथे शिवराज पवार यांचा वाढदिवस साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे जिल्हा संघटक दत्ता पवार यांचे सुपुत्र युवा उद्योजक शिवराज पवार यांचा वाढदिवस तळे हिप्परगा येथे मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
यूवा उद्योजक शिवराज पवार यांचा 9 जानेवारी रोजी वाढदिवस असतो. त्या दिवशी सर्व स्तरातून त्यांचे वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा दिल्या. तळे हिप्परगा येथे नागनाथ गणपा व मित्र परिवारच्या वतीने शिवराज पवार यांचा वाढदिवसानिमित्त शाल आणि हार पेढे भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी दत्ता पवार, नागनाथ गणपा, अनिल बनपट्टे, राजू जाधव, आनंद पवार, विशाल निंबाळकर, चंद्रकांत गुंजाळ इ. उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment