सारा न्यूज नेटवर्क -
भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सध्या महापालिकेकडून निराळे वस्ती ते अरविंद धाम अवंती नगर भागाकडे जाणारा रोडवर ड्रेनेजचे काम चालू असल्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आला असल्याने त्या परिसरातील लोकांना हॉटेल अँबेसिडर शरद पवार हायस्कूल ह्या रोडने जावे लागत होते परंतु शरद पवार हायस्कूल जवळ ड्रेनेजचे काम झाल्यामुळे रस्ता खचल्याने मोठमोठे खड्डे पडले होते.अनेक वाहनधारक,महिला वर्ग यांना त्रास होत असले बाबत त्यांनी माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली होती.ही बाब लक्षात घेऊन त्यांनी संबंधित अधिकारी व सोलापूर महानगरपालिका ब्रेकिंग ग्रुपवर व आयुक्त मॅडम यांना सदर रोडच्या समस्या बाबत माहिती दिली होती.
या बाबत दैनिक जनसत्य या दैनिकाने सदरची बातमी प्रसारित केल्यामुळे महापालिकेकडून तातडीने सदरचा रोड दुरुस्तीसाठी महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अवंती नगर,अरविंद धाम व परिसरातील भागातील लोकांना सदर रोड वरील खड्डे पडलेले त्रासापासून सुटका झाली.
याबद्दल माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण व दैनिक जनसत्य यांचे त्या परिसरातील लोक आभार मानत आहेत.व आपले मनोगत व्यक्त करीत आहेत की आपल्या सारखे कर्तव्यदक्ष नगरसेवक सध्या सोलापूर शहराला पाहिजे फक्त एक मेसेज मुळे सोलापूर महानगरपालिका खडबडून जागी झाली व तातडीने तो रस्ता दुरुस्त करून घेत आहेत त्याबद्दल आपले व दैनिक जनसत्यच मनापासून आभार मानत आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत व केले कामाबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment