Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, January 18, 2024

जिल्हा परिषद येथे विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी वतीने राम हुंडारे यांचा सत्कार संपन्न..

 सारा न्यूज नेटवर्क - 

जिल्हा परिषद येथे विविध सामाजिक संघटनां पदाधिकारी वतीने राम हुंडारे यांचा सत्कार संपन्न..


सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याने राम हुंडारे यांचा विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनाच्या वतीने जिल्हा परिषद येथे शाल व पुष्पगुछ देऊन  सत्कार करण्यात आला. 

राम हुंडारे हे पत्रकार सुरक्षा समितीच्या  माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती, राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता, पत्रकारांसाठी विमा योजना,पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे, पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर राम हुंडारे पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या कार्याची दखल घेत त्यांची पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली आहे.


राम हुंडारे यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल घालून पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील शुभ कार्यासाठी  त्यांना शुभेच्छा देण्यात. 

यावेळी परिवर्तन फाऊंडेशनच्या महिला जिल्हा अध्यक्षा लैला जमादार, बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे, बहुजन हक्क अभियानचे जिल्हा कार्याध्यक्ष अहद काझी व शहर युवक अध्यक्ष रितेश अष्टुळ, जिल्हा परिषद खोके धारक संघटनेच्या ललिता खंडागळे, शहनाज जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment