सारा न्यूज नेटवर्क -
सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांना युवा भिम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र कडून राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान..
सोलापूर (प्रतिनिधी) :- युवा भिम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचा सहावा वर्धापन दिन सोलापूर रंगभवन चॊकातील समाजकल्याण केंद्र या ठिकाणी साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने" महाराष्ट्र राज्य सामाजिक पुरस्कार" हा राज्यस्तरीय पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना प्रदान करण्यात आला.
सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांना युवा भिम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावरील "महाराष्ट्र राज्य सामाजिक पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
सारा सामाजिक बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष राम हुंडारे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत, विविध ठिकाणी वृक्षारोपण करणे, गरीब व गरजू लोकांना शासकीय योजना व शासकीय मदत मिळवून देणे, शालेय मुलांना वह्या व पेन वाटप करणे, बॅक कर्ज प्रकरणे बद्दल माहिती व मार्गदर्शन करणे, सुशिक्षित बेरोजगार लोन साठी मार्गदर्शन व सहकार्य करणे, निराधार व बांधकाम कामगार कल्याण योजने संदर्भात जनजागृती करणे व कार्ड काढण्यासाठी मार्गदर्शन करणे अशा विविध विषयांवर सामाजिक कार्य केलेले आहे, त्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सारा सामाजिक बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष व सारा न्यूज नेटवर्कचे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे यांच्या त्या त्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल युवा भिम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष महेश(अण्णा) डोलारे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक राम हुंडारे
No comments:
Post a Comment