सारा न्यूज नेटवर्क -
*नळदुर्ग हद्दीतील अवैधरीत्या मुरूम उपसा बाबत , थेट मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांच्याकडे तक्रार दाखल!*
सोलापूर (प्रतिनिधी) :- धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे नळदुर्ग ते अक्कलकोट रोड बि.के फंक्शन हॉलच्या शेजारी व परिसरातील अनेक ठिकाणी अवैधरित्या बिनधास्तपणे शासनाची कुठलीही रॉयल्टी न भरता मुरूम उपसा रात्रंदिवस सुरू आहे. त्या ठिकाणी काही शासकीय अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून राजेरोसपणे शासनाचा महसूल( रॉयल्टी ) बुडवण्याचे काम बिनधास्तपणे सुरू आहे.
माती व मुरूम रात्रंदिवस उचलण्यात येत आहे नळदुर्ग हद्दीतील मुरमाचे उत्खनन सर्रासपणे चालू आहे गोणखणीज माफियांची मोठी टोळी या परिसरात कार्यरत आहे महसूल विभाग कारवाई करत नसल्याने या मागचे गोळबंगाल दिसून येत आहे . तलाठी, मंडळ अधिकारी, प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात. गोणखणीच्या वर लक्ष ठेवणे हे तलाठ्याचे आद्य कर्तव्य आहे. गोणखनिज बाबतचा अहवाल तहसील कार्यालयात दाखल करणे हे कार्य तलाठी यांनी केले पाहिजे व असेच रॉयल्टी भरून परवानगी घेतलेल्या गोणखणीजाची परवान्यानुसार व नमूद केलेल्या मुद्दतीत उत्खन झाली पाहिजे परंतु सध्याच्या स्थितीत अशा काहीही परिस्थितीत त्या ठिकाणी दिसत नाही यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी व अनेक शासकीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष धाराशिव अंतर्गत आदेश पारित करावे व त्या ठिकाणी अवैधरीत्या मुरूम उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा. म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष धाराशिव यांच्याकडे निवेदन द्वारे तक्रार दाखल केली आहे.
निवेदनामध्ये सादिक शेख यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष धाराशिव यांना दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी तुळजापूरच्या तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या तक्रार व दिनांक एक जानेवारी 2024 रोजी धाराशिव चे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारबाबत माहिती दिली आहे.
थेट बेमुदत आंदोलनाचा इशारा
मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख यांनी माध्यमांची बोलताना म्हणाले की येणाऱ्या दहा दिवसात नळदुर्ग येथे अवैध अवैधरित्या मुरूम उपसा करणाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर धाराशिव च्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलनास बसणार आणि या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी शासनाची असणार असा इशारा सादिक शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment