Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, January 8, 2024

श्री संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन कडून दर्याप्पा खडाखडे व राम हुंडारे यांचा सत्कार संपन्न...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

श्री संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन कडून दर्याप्पा खडाखडे व राम हुंडारे यांचा सत्कार संपन्न...

सोलापूर (प्रतिनिधी) :- श्री संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन (कार्यक्षेत्र संपूर्ण भारत)  महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री देवाप्पा शिंदे आणि पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते वांगी गावचे सुपुत्र दर्याप्पा खडाखडे यांची वांगी गावचे पोलीस पाटील या पदी नियुक्ती झाल्याबद्दल यांचा सत्कार  करण्यात आला आणि त्यांना पुढील शुभ कार्यासाठी  त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 


याप्रसंगी राम हुंडारे यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचा हि सत्कार श्री संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री देवाप्पा शिंदे आणि पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते फेटा बांधुन व हार घालून सत्कार करण्यात आला. 

 कार्यक्रमाप्रसंगी वांगी गावचे ग्रामपंचायत सदस्य अरुण जळकोटे, सामाजिक कार्यकर्ते कबीर तांडुरे, किरण तोडकरी, यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment