सारा न्यूज नेटवर्क -
बिना भिंतीची निसर्गाच्या सानिध्यात शाळा भरली..
सोलापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय पक्षी दिना निमित्त सोलापूर महानगरपालिका 28 नंबर या शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण येतील स्मृति उद्यान या परिसरातील निसर्गाच्या सानिध्यात मुलांना आज निसर्ग भ्रमंती करण्यात आले. निसर्गाच्या सानिध्यात जे काही डोळ्यासमोर आपल्याला पाहता येईल पण निसर्गाचा अनुभव घेता येईल त्यातून मुलांना निसर्गाची आवड निर्माण होईल निसर्गातील मानव आणि निसर्गातील आपले नाते या संदर्भातील जिव्हाळा कसा निर्माण होता होईल हा हा उद्देश होता,
मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख कृष्ण परमेश्वर सुतार सर, शिक्षक नारायणकर सर, शिक्षिका स्नेहल खराडे, सामाजिक वनीकरण चे वनपाल सचिन दोशी याने मुलांना निसर्गाचे महत्त्व पटवून दिले आणि डॉ. मनोज देवकर ज्यांना पर्यावरण दूत म्हणून संबोधले जाते त्यांनी मुलांना निसर्ग संपदा वृक्ष संपदा यातील महत्त्व आणि निसर्ग आणि मनुष्य नाते कसे जपावे याबद्दलही मुलांना माहिती दिली. यापूर्वी एक विद्यार्थी एक वृक्ष ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणून शाळेमध्ये वृक्षारोपण हे केले गेले होते तसेच आज राष्ट्रीय पक्षी दिन या दिनाचे महत्त्व व पक्षी या निसर्गातील किती महत्त्वाचा घटक आहे याबद्दल ही माहिती दिली.
राष्ट्रीय पक्षी दिवस 2024: पक्ष्यांना निसर्गातील सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक मानले जाते, जे त्यांच्या किलबिलाटाने आपला दिवस आनंददायी बनवतात. पक्ष्यांचा मधुर आवाज आपल्या मनाला शांती देतो. दिसायला सुंदर आणि रंगीबेरंगी असे विविध प्रकारचे पक्षी जेव्हा आकाशात उडतात तेव्हा ते आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालतातच, पण त्यापलीकडे ते आपल्या परिसंस्थेतही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा स्थितीत पक्ष्यांचे महत्त्व, इतिहास आणि संवर्धनाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी ५ जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो. आणि पक्षी व जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी वृक्ष हा निसर्गातील फार महत्वाचा घटक आहे त्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे हे महत्त्वाचे आहे असे पर्यावरणदुत इकोनेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ. मनोज देवकर यांनी सांगितले, त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना रोप ही देण्यात आले. 🌳
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment