सारा न्यूज नेटवर्क -
रामवाडी येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रभू रामाची महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले..
सोलापूर (प्रतिनिधी) :- आज 22 जानेवारी रोजी संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या श्रीराम यांची अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने सर्वत्र हर्ष उल्हासाचं अन् भक्तिमय वातावरण आहे. श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येपासून जणू दिवाळीची तयारी असल्याचे जाणवत होते.
अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदीर मुर्ती ची प्राण प्रतिष्ठापना निमित्त रामवाडी परिसरातील सकल हिंदु समाजाच्या वतीने गणपती मंदीर,आई जगदंबा मंदीर,बालाजी मंदीर,हनुमान मंदीर येथे प्रभु रामाचे महाआरती करुन प्रसाद वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी , हिंदु जनआक्रोश मोर्चा चे समन्वयक धर्मरक्षक शिवराज गायकवाड,युवा नेते अमोल गायकवाड,मदन आण्णा गायकवाड,अनिल गायकवाड,विक्रम गायकवाड,शुभम गायकवाड,सुमित जाधव,विकी गायकवाड,कपिल गायकवाड,कपिल जाधव,निखिल गायकवाड,महादेव शिवक्षरण,विनित गायकवाड,दिपक गायकवाड,शाम जाधव,रविंद्र गायकवाड,प्रकाश गायकवाड,राहुल हुबळी,गोपी परदेशी,लक्ष्मण गायकवाड,पिंटु जाधव,शिवा गायकवाड,राहुल गायकवाड गोपळ दोडमनी,सागर शिंगे,नागेश जाधव,गोपाळ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment