Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, January 11, 2024

पंजाब तालीम येथील मित्र परिवारच्या वतीने राम हुंडारे यांचा सत्कार संपन्न..


 सारा न्यूज नेटवर्क - 

पंजाब तालीम येथील मित्र परिवारच्या वतीने राम हुंडारे यांचा सत्कार संपन्न..

सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याने राम हुंडारे यांचा सपत्नीक मित्र परिवारच्या वतीने पंजाब तालीम येथे शाल व पुष्पगुछ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. 


राम हुंडारे हे पत्रकार सुरक्षा समितीच्या  माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती, राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता, पत्रकारांसाठी विमा योजना,पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे, पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर राम हुंडारे पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या कार्याची दखल घेत त्यांची पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली आहे.

राम हुंडारे यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल घालून पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील शुभ कार्यासाठी  त्यांना शुभेच्छा देण्यात. 

यावेळी फयाज शेख, एजाज हुंडेकरी, नवाज हुंडेकरी, अजिम पटेल, संतोष तोडकरी महेबुब शेख आदी मित्र परिवार उपस्थित होते. 


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment