Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, January 22, 2024

पंचमुखी हनुमान मंदिर विजापूर रोड वतीने प्रभू रामाची महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पंचमुखी हनुमान मंदिर विजापूर रोड वतीने प्रभू रामाची महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले..

सोलापूर (प्रतिनिधी) :- आज 22 जानेवारी रोजी संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या श्रीराम यांची अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठान कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने सर्वत्र हर्ष उल्हासाचं अन् भक्तिमय वातावरण आहे. श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येपासून जणू दिवाळीची तयारी असल्याचे जाणवत होते.

  आज अयोध्या येथील रामजन्म स्थापनेनिमित्त पंचमुखी हनुमान मंदिर विजापूर रोड सोलापूर येथे श्रीरामाची महाआरती करून जीके मागासवर्गीय संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या हस्ते पूजा करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमास महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी तरून बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या कार्यक्रमास श्री रामचे पूजन करून आशीर्वाद घेतला राम कुलकर्णी, अविनाश गुरव, राजू कांबळे, राजू पोद्दार तसेच बाळ गोपाळ मुख्य संख्येने उपस्थित होते. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment