Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, January 7, 2024

पत्रकार संघर्ष योद्धा यशवंत पवार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पत्रकार संघर्ष योद्धा यशवंत पवार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.. 

सोलापूर( प्रतिनिधी) : -  पत्रकार सुरक्षा समिती  चे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार हे राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून 

पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून  अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार हे  पत्रकार सुरक्षा समिती वतीने काम करत आहेत.

*6 जानेवारी पत्रकार दिन व यशवंत पवार यांचा वाढदिवस एकदा वेळी*

 पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवस 6  जानेवारी पत्रकार दिनी असल्याने मानव अधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र वतीने यशवंत पवार यांचा वाढदिवसानिमित्त शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटना प्रदेश अध्यक्ष सादिक शेख प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे प्रदेश संपर्क प्रमुख मेहबूब कादरी सोलापूर जिल्हा अध्यक्ष (आरोग्य विभाग) अकबर शेख सोलापूर जिल्हा महासचिव परवेज मुल्ला व अन्य सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment