Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, January 14, 2024

शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज नंदिध्वज मिरवणूकीत कक्कय्या समाज बांधवांकडून भक्ताना दुध वाटप...

 


सारा न्यूज नेटवर्क -

शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज नंदिध्वज मिरवणूकीत कक्कय्या समाज बांधवांकडून भक्ताना दुध वाटप...

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहराचे आराध्य दैवत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरवात झाली. तैलाभिषेकने ( यण्णीमज्जल ) यात्रेचा पहिला दिवस सुरू झाला. श्री सिद्धरामेश्वर स्थापित 68 लिंगांना तेल आणि हळदीच मिश्रण असलेले द्रव्य लेपन केलं जातं.जवळपास २० किलोमीटर पायी चालत ६८ लिंगांची  यात्रा पूर्ण केली जाते.

सोलापूर शहराचे आराध्य दैवत श्री सिद्धरामेश्वर नंदिध्वज मिरवणूक आज सोलापूर शहरातून नंदिध्वज मिरवणूक पार पडली.या नंदिध्वज मिरवणूकीत कक्कय्या समाज बांधवांकडून भाविकांना दूध वाटप करण्यात आले. संत कक्कया समाज अध्यक्ष जितेंद्र होटकर, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, जीके मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, शिवाजी वाघमोडे, मनीष होटकर यांच्या हस्ते भक्तांना दूध वाटप करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी ढोर समाजातील ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व सिद्धेश्वर भक्तगण हर हर बोला सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा घोषणा तरुण वर्ग देत मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

हा कार्यक्रम समाजाच्या वतीने दरवर्षी राबविला जातो सर्व भक्तगण मसाला दूध याचा आस्वाद मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेत असतात.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment