Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, January 29, 2024

प्रजासत्ताक दिनी गुरववाडी येथील विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप..


 सारा न्यूज नेटवर्क - 

प्रजासत्ताक दिनी गुरववाडी येथील विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप.. 

अक्कलकोट(प्रतिनिधी) :- अक्कलकोट तालुक्यातील मौजे गुरववाडी  येथे 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. प्रारंभी गुरुवाडीच्या विद्यमान महिला सरपंच सौ. लक्ष्मी म्हाळाप्पा पुजारी यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. गुरववाडीच्या विद्यमान महिला सरपंच सौ. लक्ष्मी म्हाळाप्पा पुजारी यांच्या हस्तेध्वजारोहण करण्यात आले.

दरम्यान प्रजासत्ताक दिनाचे औचित्य गुरववाडी पंचक्रोशातील लाभार्थ्यांना मोदी घरकुल आवास योजनेअंतर्गत गुरववाडी ग्रामपंचायतीच्या वतीने म्हाळप्पा पुजारी यांनी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून 16 लाभार्थ्यांची घरकुल मंजूर केले. व कृषी खात्याकडून चार लाभार्थ्यांना दोन डिझेल इंजन दोन पाणबुडी मोटर अशा एकूण २० वीस लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजूर पत्र विद्यमान महिला सरपंच सौ.लक्ष्मी माळप्पा पुजारी व गुरववाडीचे विकासरत्न माळाप्पा पुजारी यांच्या शुभहस्ते मंजूर पत्र देण्यात आले.

यामध्ये शासकीय लाभ मंजूर झालेले लाभार्थ्यांची नावे खालील प्रमाणे. 

अर्जुन बहादुरे. राजाराम विजापुरे.गुरुशांत सावळी. भिमराया फुलारी. लक्ष्मण इंगळगी. सरदार इंगळगी. मलकणा औराद. रविकिरण स्वामी. शरणया स्वामी. चंद्रकांत रावजी. श्रीमंत सावळी.सिद्धप्पा सावळी.  काशिनाथ मुतगी. मल्लिनाथ  ईकळकी. शिवानंद मुंडेवाडी. गंगाप्पा रावजी. अशी एकूण सोळा लाभार्थ्यांना दांपत्यसह घरकुल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. 

तसेच पंचायत समिती  कृषी खात्यामार्फत दिलेले लाभार्थी श्रीमती गंगाबाई गुरव. शिवानंद फुलारी मेजर.सायबणा पुजारी.  आकाश मुनाळे. दोन पाणबुडी मोटर दोन डिझेल इंजन असे एकूण 20 लाभार्थ्यांना गुरववाडी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच सौ लक्ष्मी मा. पुजारी यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

दरम्यान अर्जुन कल्लप्पा बहादुरे यांचे घरकुलचे भूमिपूजन सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी सरपंच यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी गुरववाडी  ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थानसमवेत  ग्रामसभाही घेण्यात आली व ग्रामस्थांच्या विविध गाव पातळीवरील अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी तंटामुक्त अध्यक्ष रविकिरण स्वामी, माजी सरपंच तुकाराम विंचुरे  माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बसवराज देवरमनी,उसरपंच जगदीश स्वामी, ग्रामपंचायत सदस्य सारिका वंकारी. पोलीस पाटील सिद्धलिंग मुनाळेजमाजी डेप्युटी सरपंच कल्याणी रावजी बचत गटाच्या महिला अध्यक्ष अनिता मोती,मराठी शिक्षण समितीचे अध्यक्ष सुखदेवी बहादुरे,आरोग्य सेविका चव्हाण मॅडम सर्व अंगणवाडी सेविका अंबाबाई फुलारी. निलाबाई मुंडेवाडी .जिल्हा प्राथमिक मराठी शाळा मुख्याध्यापक व शिक्षक चौगुले सर. गंगोडा सर. चव्हाण सर .आशा वर्कर अश्विनी फुलारी.व ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी. व गुरुशांत सावळी.आदींसह गुरववाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment