Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, January 31, 2024

पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिक पोलीस अकादमीला बदली..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

एम राजकुमार सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिक पोलीस अकादमीला बदली. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- गृह विभागाने राज्यातील 44 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे तर पोलिसांचा राजेंद्र माने यांची नाशिक पोलीस अकादमी ला बदली झाली आहे. 

राज्याच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यात सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिक पोलीस अकादमी ला बदली झाली असून त्यांच्या जागी जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार पदोन्नतीने बदलून येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment